Subscribe Us

header ads

जमीअत उलमा ए हिंद कडून पैगंबरांचे जीवन चारित्र्य व समाज सुधारावर आधारित दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 


जमीअत उलमा ए हिंद कडून पैगंबरांचे जीवन चारित्र्य व समाज सुधारावर आधारित दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

बीड (प्रतिनिधी) - शहरात बुधवार व गुरुवारी दिनांक २६ व २७ ऑक्टोबर २०२२ रोजी जमीअत उलमा ए हिंद कडून पैगंबरांचे जीवन चारित्र्य व समाज सुधारावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात नशा मुक्ती, मोबाईल चा गैरवापर यावरही प्रबोधन केले जाणार असून दोन दिवसीय कार्यक्रमात सर्व मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन जमीअत उलमा ए हिंद बीड तर्फे करण्यात आले आहे. याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, भारत देशाचे महान धर्मपंडित आणि शेख-उल-इस्लाम यांचे नातू हजरत मौलाना मुफ्ती सलमान मन्सूरपुरी दामत बरकथम अल-आलिया यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. ज्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राची शान मौलाना हाफिज नदीम सिद्दीकी असतील तर जमीअत उलमा ए हिंद चे  सोलापूर जिल्हाध्यक्ष  मौलाना इब्राहिम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बुधवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ रोजी किल्ला मैदान येथील जामा मस्जिद मध्ये संध्याकाळी  असर नमाज नंतर उलमा आणि दानिश्वरांची बैठक  होणार आहे. यात उपरोक्त विषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आ हदीस आणि न्यायशास्त्राचे शिक्षक हजरत मौलाना मुफ्ती सलमान मन्सूरपुरी, दामत राजौरी बरकथम अल आलिया, मगरीबच्या नमाजनंतर संध्याकाळी बशीरगंज राजुरी वेस जवळ असलेल्या मरकज मस्जिद मध्ये व्याख्यान आयोजित केले आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी फजरच्या नमाज नंतर हजरत वाला महेबूब उलूम महेबूबीया मस्जिद अख्तर नगर इस्लामपुरा बीडचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी आठ वाजता मोमीन अल् बनात अरबी मदरसा जुनाबाजार येथे महिला वर्गाला संबोधित करणार आहे. या कार्यक्रमांना मुस्लिम बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन जमीअत उलमा ए हिंद चे बीड जिल्हाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्ला कुरेशी, सचिव मौलाना साबीर व शहराध्यक्ष मौलाना हाफिज वसीम यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा