Subscribe Us

header ads

दूरदृष्टी आणि संयमी नेतृत्व.!

बीड स्पीड न्यूज 


दूरदृष्टी आणि संयमी नेतृत्व.! 

आपल्या बीड जिल्ह्याला अलौकिक असा वारसा आहे तो म्हणजेच राजकारणाचा. बीडच्या वैभवात ज्यांनी पदोपदी भर घातली अश्या बीडच्या विद्येच्या जननी स्व.आदरणीय केशर काकु क्षीरसागर यांच्या पावलावर पाऊल टाकत बीडच्या मातीला विकासाची झळाळी देणारे लोकनेते अण्णासाहेब आणि कार्यसम्राट नगराध्यक्ष साहेब बीडच्या राजकारणात सक्रिय असणारे हे नेतृत्व जवळजवळ 30-35 वर्षापासुन या बीड शहराचा कार्यभार उचित रित्या  सांभाळत आहेत असे कार्यसम्राट नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर साहेब यांचे चिरंजीव व लोकनेते अण्णासाहेब यांचे पुतणे डॉ, योगेशजी (भैय्या) क्षीरसागर साहेब तळागाळातील लोकांना सोबत घेत युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत त्यांना साथ देत आहेत त्यांनी संबंध बीडच्या जनतेची मन जिंकली असे एकनिष्ठ एकवचनी नेतृत्व डॉ, योगेशभैय्या क्षीरसागर साहेब 
शिव, फुले, शाहु, आंबेडकर, साठे या महामानवांच्या परिवर्तनवादी विचारांना जागून व स्वर्गीय, काकूंनच्या विचारावर चालत कष्टकरी उपेक्षितांच्या मुलांकरिता अनेक उपक्रम या बीड शहरामध्ये राबवले युवकांच्या हृदय स्थानी असलेले डॉ योगेशजी क्षीरसागर यांना प्रत्यक्षात अनुभवता येते बीड जिल्ह्याला एक दूरदृष्टी आणि संयमी नेतृत्व लाभलं आहे. बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता विशेष व तंत्रज्ञानाशी जोडलेली अभ्यासिका बीड नगरीमध्ये आणून प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न त्यांनी पूर्ण करण्याच महान कार्य केलं आहे 
आजच्या युगामध्ये राजकारणी फक्त कामापुरतं बोलतात पण डॉ, योगेशजी क्षीरसागर साहेब काम सांगताच काम करणारे नेतृत्व मी पाहिलं ज्या वेळेला प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक व माझे वडील ॲड विकासजी जोगदंड साहेब यांच्या प्रचाराकरिता भैय्यासाहेब आले प्रत्येकाला आपुलकीने आणि प्रेमाने संबोधन करून आपलंस करून घेत. माझ्या वडिलांच्या प्रचाराकरिता भैय्यासाहेब आमच्या घरी आले असता माझी ओळख जोगदंड साहेबांनी करून दिली नंतर अनेक कार्यक्रमांमध्ये जवळ येण्याचा प्रसंग आला प्रत्येक वेळी मी पाहत होतो की त्यांच्या मनामध्ये नेहमी जनतेविषयी सोज्वळ आणि निर्मळ विचार असणं. हे त्यांच्याकडे पाहून लक्षात येतं व्यावसायिक दृष्टया ते वैद्यकीय क्षेत्रात असले तरी ते एक सच्चे समाजसेवक आहेत  भैय्यासाहेब आपल्या कर्तुत्वाने, आणि सामर्थाने जनतेच्या मनात एक वेगळा ठसा उमठविला आहे . 

"निखारा कधीच जळत नसतो त्यात ताहुन सुलाखून निघाल्याशिवाय सशक्त होत नाही". 
हिच किर्ती आहे क्षीरसागर कुटुंबीयांची माझ्या मार्गदर्शकास जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.! 

आदर्श विकासराव जोगदंड 
( तथागत प्रतिष्ठान, बीड )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा