Subscribe Us

header ads

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (संचालित) बळीराजा एकता समितीची बैठक उत्साहात पार पडली.

बीड स्पीड न्यूज 


राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (संचालित)                    बळीराजा एकता समितीची बैठक उत्साहात पार पडली.      

प्रतिनिधी |  मंगळवेढा; दिनांक शुक्रवार 28/10/2022  लोणार ग्रामपंचायत आफीस लोणार ता मंगळवेढा जि सोलापूर येथे संघाच्या पी आर ओ ज्योती खिलारे यांच्या अध्यक्ष बैठक पार पडली नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांना विम्याचं संरक्षण मिळावं आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावं, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात आलं. परंतु फार भयानक परिस्थिती आहे कुठल्या शेतकरीला याचा लाभ मिळाला नाही पिक विमा योजना म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूकच यापुढे अशी फसवणूक बळीराजा एकता समिती सहन करणार नाही लवकरात लवकर आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असे आव्हान सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्राचे विद्यमान सरकाराला केले.शेतकऱ्यांनो आत्महत्या हा पर्याय नाही. आपल्यावर ही वेळ आणणाऱ्यांच्या गचांड्या धरून त्यांना रस्त्यावर आणू, संघर्ष करू, मात्र आत्महत्येचा मार्ग धरू नका. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ( संचालित ) बळीराजा एकता समिती  तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे," असं आवाहनही संघाच्या पी आर ओ ज्योती खिलारे यांनी शेतकऱ्यांना केलंय पंढरपूरमधील तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. 23 वर्षीय सुरज जाधव या शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली
सुरज जाधव यांनी आत्महत्येपूर्वी व्हीडिओ बनवला आणि आपली हतबलता त्यातून व्यक्त केली. हा व्हीडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. सुरज जाधव पंढरपूरमधील मगरवाडी येथील राहणारे होते.आत्महत्यापूर्वी बनवलेल्या व्हीडिओतून ते म्हणाले की, "शेतकऱ्याच्या पोटी पुन्हा जन्माला येणार नाही. शेतकऱ्याचा सरकार विचार करत नाही. जोपर्यंत सरकार आहे, तोपर्यंत शेतकरी नाही.. "तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना 24 तास मोफत देतं, कर्नाटक सरकार दिवसा सात दिवस वीज देतं, राजस्थान सरकार शेतकऱ्यांना दिवसा वीज देतं. मग कृषिप्रधान महाराष्ट्र सरकारला काय लकवा मारला का असा संताप जनक सवाल पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्रीशांत हाताळे यांनी केला.सरकारनं शेतकऱ्यांसाठी म्हणून कंपन्यांकडे दिलेले पैसे यात कंपन्यांचा ठरावीक हिस्सा वगळून उरलेले पैसे शेतकऱ्यांना दिलेच पाहिजे. सरकारनं हा पैसा कंपन्यांकडून परत घ्यावा आणि शेतकऱ्यांना द्यावा. शेतकऱ्यांचा पैसा खाणाऱ्या कंपन्यांना कडक शिक्षा हवी," अशी मागणी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी केली त्यांन केली आहे.संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी सर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ( संचालित )
बळीराजा एकता समितीमध्ये तालुकाध्यक्ष पदी भिमू गोविंद बिराजदार यांची निवड  निवड करण्यात आली या बैठकीस हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पदाधिकाऱ्यांची नावे 1) PRO ज्योती  खिलारे - शिवाजी खिलारे 2) पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्रीशैल ध हत्ताळी 3)सोलापूर जिल्हाध्यक्ष सिद्धाण्णा हत्ताळी 4) सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष मलीकार्जून साखरे 5) सोलापूर जिल्हासदस्य वसंत जावीर 6)खडीक्रेशर मालक व दामाजी कारकाना संचालक गौडाप्पा बिराजदार तसेच नवीन ज्वाईन होणारे पदाधिकारी 7) रेवणसिद्ध मलाबदी 8) सिवू आडकी 9)बंडू नवनाळे 10)रमू कलमडी व ईतर शेतकरी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा