Subscribe Us

header ads

शेख ज़ाफ़र सुलतान चे बायोटेक्नॉलॉजीत घवघवीत यशमौलाना आझाद महाविद्यालयात विभागात दुसरा

बीड स्पीड न्यूज 



शेख ज़ाफ़र सुलतान चे बायोटेक्नॉलॉजीत घवघवीत यश
मौलाना आझाद महाविद्यालयात विभागात दुसरा




औरंगाबाद (प्रतिनिधी) - येथील मौलाना आझाद कॉलेज ऑफ सायन्स मधील बीएससी बायोटेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थी शेख ज़ाफ़र सुलतान याने पदवी परीक्षेत ८० टक्के गुण घेत विभागात दुसरा येण्याचा मान मिळविला. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. मझहर अहेमद फ़ारुक़ी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. शेख ज़ाफ़र हा इयत्ता दहावी व बारावी मध्येही विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला होता. यानंतर त्याने बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेतले. दरवर्षी चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण होत राहिला. आता बीएससी बायोटेक्नॉलॉजी च्या पदवी परीक्षेत सुद्धा ८० टक्के गुण घेत उत्तीर्ण झाला. त्याला कॉलेजच्या अध्यापिका डॉ. रेश्मा ज़वेरीया यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. शेख ज़ाफ़रने ८० टक्के गुण घेत मिळविलेल्या या यशाने त्याचे पुढील शिक्षण एमएससी बायोटेक्नॉलॉजीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शासकीय कोट्यातून नंबर लागला आहे. याबद्दल त्याचे मौलाना आझाद शिक्षण संस्थेने तसेच सर्व अध्यापक, अध्यापिकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच बीड शहरातील त्याचे मामा मुक्तपञकार  एस.एम.युसूफ़ यांच्यासह समाजातील सर्वस्तरातूनही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याने शिक्षण क्षेत्रात यापुढेही चांगल्यात चांगले कार्य करावे व उत्तरोत्तर प्रगती करावी अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा