Subscribe Us

header ads

शिवसेना संपर्कप्रमुख धोंडु पाटील यांचा भोजराज पालिवाल यांच्या वतीने सत्कार

बीड स्पीड न्यूज 


शिवसेना संपर्कप्रमुख धोंडु पाटील यांचा भोजराज पालिवाल यांच्या वतीने सत्कार

भवानीनगर दुर्गादेवीची श्री.पाटील यांच्या हस्ते पूजा संपन्न

परळी/प्रतिनिधी-: शिवसेनेचे संपर्क प्रमुख धोंडु पाटील यांनी आज शुक्रवार दि.30 सप्टेंबर रोजी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री.पाटील यांचा श्री.पालीवाल यांनी सत्कार केला. शुक्रवार दि.30 सप्टेंबर रोजी शिवसेनेचे संपर्क प्रमुख धोंडू पाटील हे परळी शहरात आले असता त्यांनी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या भवानीनगर येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाच्या दुर्गादेवीची श्री.धोंडु पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने श्री.पाटील यांचा भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा शिवसेना मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व भगवा फेटा घालून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शिवसेनेचे मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्यासह शिवसेना बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर, तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा अतुल दुबे महेश केंद्रे गजराज पालीवाल प्रकाश साळुंखे हरीश पालीवाल संतोष सावंत विजय जाधव यांच्यासह असंख्य शिवसैनिक युवासैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा