Subscribe Us

header ads

ऊसतोड मजूर, महिला यांचे प्रश्न प्रशासनाने समन्वयाने सोडवावेत- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

बीड स्पीड न्यूज 


ऊसतोड मजूरमहिला यांचे प्रश्न प्रशासनाने समन्वयाने सोडवावेतविधानपरिषद उपसभापती डॉनीलम गोऱ्हे

 

बीड | प्रतिनिधी  दि. 01 -: ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनातील संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने सोडवावेतअसे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉनीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्याप्रगती सभागृहजिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्माजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवारअपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.ऊसतोड मजूर नोंदणीत्यांच्या पाल्यांची शिक्षणभोजन व निवासाची सोयमहिलांचे प्रश्नऊसतोड मजुरांचा विमात्यांना शिधापत्रिकेवरील धान्य स्वरूपात उपलब्ध करून देणे आदिंबाबतचा आढावा घेऊन विधानपरिषद उपसभापती डॉनीलम गोऱ्हे यांनी ऊसतोड मजूर नोंदणीसाठी जिल्हा परिषदेमार्फत विकसित करण्यात आलेले ॲप अन्य 11 जिल्ह्यात राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दाखवलेल्या सकारात्मक तयारीबाबत समाधान व्यक्त केलेतसेचया ॲपचा अधिकाधिक ऊसतोड मजुरांना लाभ व्हावायादृष्टीने मौलिक सूचना केल्या.उपसभापती डॉनीलम गोऱ्हे म्हणाल्यागळीत हंगामाच्या पार्श्वभूमिवर ऊसतोड मजूर नोंदणीत्यांच्या पाल्यांची वसतिगृहामध्ये निवासभोजन व शिक्षणाची व्यवस्था आदिबाबत समाज कल्याणआरोग्यमहिला व बाल विकास तसेच शिक्षण विभागअन्न व नागरी पुरवठा विभाग आदि संबंधित सर्व विभागांनी संयुक्तिक प्रयत्न करावेत व ते प्रश्न समन्वयाने सोडवावेतऊसतोड मजुरांच्या पाल्यांची आठवीनंतरच्या शिक्षणाची सोय व्हावीयासाठी समाजकल्याण विभागाने वसतिगृहांबाबत आवश्यक कार्यवाही करावीप्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी समाजकल्याण विभागाचे सचिव व ऊसतोड मजूर महामंडळाचे अधिकारी यांच्याशी बैठक घेण्यात येईलमात्र तोपर्यंत तातडीच्या उपाययोजनांसाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावाअसे त्या म्हणाल्याअवैध गर्भपात रोखण्यासाठी गोपनीय माहिती घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यातअशा सूचना करूनविधानपरिषद उपसभापती डॉनीलम गोऱ्हे म्हणाल्या, 30 वर्षे वयाखालील महिलांच्या गर्भपात व गर्भाशय पिशवीसंदर्भातील शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाची परवानगी घ्यावी लागतेमात्रसमाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहेत्यामुळे अवैध गर्भपात व गर्भाशय पिशवी शस्त्रक्रिया रोखण्यासाठी जिल्हाधिकारीजिल्हा पोलीस अधीक्षक व आरोग्य विभागाची समिती स्थापन करावीस्री रोग तज्ज्ञ व प्रसुतिगृहांना वेळोवेळी येणाऱ्या नियमांची माहिती देऊन अद्ययावत करावेअसेही त्यांनी सांगितलेतसेचबालविवाह रोखण्यासाठी आई वडिलांसोबत कुटुंबातील अन्य सदस्यांचा गावनिहाय कुटुंब मेळावा घेऊन समुपदेशन करावेअसेही त्या म्हणाल्या.जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणालेउपसभापती डॉनीलम गोऱ्हे यांनी बैठकीत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने दोन दिवसात सर्व संबंधित विभागांना लेखी सूचना देण्यात येतीलत्यादृष्टीने सर्वांनी कार्यवाही करावी.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी ऊसतोड कामगारांसाठी जिल्हा परिषदेमार्फत विकसित करण्यात आलेले ॲपपाणंदमुक्त रस्ते यासह जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिलीअवैध गर्भपात प्रकरणी केलेली कार्यवाही बाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉसुरेश साबळे व केलेल्या फौजदारी कारवाईबाबत अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी माहिती दिलीऊसतोड कामगारांच्या पाल्याचे शिक्षण व वसतिगृहांबाबतची माहिती शिक्षण व समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा