Subscribe Us

header ads

वंचित, उपेक्षितांचा आवाज बुलंद करणार: पप्पू कागदे

बीड स्पीड न्यूज 


वंचित, उपेक्षितांचा आवाज बुलंद करणार: पप्पू कागदे

समारंभ : रिपाइंच्या अद्ययावत कार्यालयाचे उदघाटन उत्साहात

राजकीय,सामाजिक क्षेत्रातील तब्बल चार हजार स्नेहिनी दिली सदिच्छा भेट



बीड / प्रतिनिधी-: वंचित उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाने कायमच अग्रही भूमिका घेतलेली आहे. यापुढेही हा लढा सुरूच राहील, त्यासाठी त्यांचा आवाज बनून संघर्ष करत राहू. रिपाइं कार्यालयाच्या या उदघाटनाला राजकिय, सामाजिक सर्वच क्षेत्रातील जवळपास चार हजार स्नेही जणांनी उपस्थिती लावली, हा आपुलकीचा स्नेह कायम असाच राहील, असे प्रतिपादन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी व्यक्त केले. शहरातील बशीर गंज येते शुक्रवार (दि.28) ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता रिपाइंच्या अद्ययावत पक्ष कार्यालयाचे उदघाटन पार पडले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पप्पू कागदे बोलत होते.दरम्यान सुशीलाताई मोराळे यांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थितीत भिकू धम्मशील, माजी आ. राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, माजी आ.सिराज देशमुख, मोईन मास्टर, अड. बाळासाहेब राख, समता परिषदचे अड. सुभाष राऊत, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, अमर नाईकवाडे, एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष निजाम शेख, फारुख पटेल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर घुमरे, चंद्रकांत नवले, शिवराज बांगर,बाळासाहेब पिंगळे शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद, प्रभाकर कोलंगडे आप्पा, सुहास पाटील, मनोज जाधव, सचिन कोटूळे, अनिल घुमरे,  गंगाधर पुरी, शंकर जाधव, अर्जुन दळे, प्रकाश कांनगावकर, संजय गुरव, आसाराम गायकवाड, गोरख रसाळ, विलास महाराज यांच्यासह नगरसेवक, राजकीय, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पप्पू कागदे म्हणाले की, रिपाइंचे पूर्वीचे कार्यालयात सामाजिक गर्दी पाहता अपुरे पडत होते. त्यामुळे अद्ययावत कार्यालय उभारले आहे. रिपाइं सुरुवातीपासूनच न्याय हक्कासाठी लढत आलेला पक्ष आहे.आगामी काळात या कार्यालयातून समाजाच्या न्याय हक्काचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी रिपाइं सज्ज होती, आहे, आणि राहील असे मत पप्पू कागदे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संयोजक राजू जोगदंड, किशन तांगडे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. यावेळी रिपाइं पदाधिकारी सचिन कागदे,मझहर खान,अशोक साळवे,किशोर कांडेकर,महादेव उजगरे,अरुण भालेराव,दिपक कांबळे,डॉ.नरेंद्र जावळे,अविनाश जावळे,दशरथ सोनवणे,धोंडीराम सिरसट,महेश आठवले,गोवर्धन वाघमारे,लक्ष्मण सिरसट,अरुण निकाळजे,उत्तम आप्पा मस्के,दिपक कांबळे,बापू पवार,सुभाष तांगडे,अविनाश जोगदंड,मायाताई मिसळे, महेंद्र वडमारे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा