Subscribe Us

header ads

कोल्हापुर येथे होणाऱ्या सब ज्युनियर बास्केटबॉल स्पर्धेत साठी तुलसी इंग्लीश स्कुल च्या शेख रेहान सलीम यांची निवड

बीड स्पीड न्यूज 


कोल्हापुर येथे होणाऱ्या सब ज्युनियर  बास्केटबॉल स्पर्धेत साठी तुलसी इंग्लीश स्कुल च्या शेख रेहान सलीम यांची निवड

बीड | प्रतिनिधी -: दि. 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2022 रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या 13 वर्षाखालील सबजूनियर बास्केटबॉल स्पर्धेसाठी शेख रेहान सलीम याची निवड झाली असुन ती स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. शेख रेहान हा प्रशिक्षक अजहर सिद्दीकी सर , गणेश जाधव सर, प्रशांत जोजारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय बीड येथे सराव करीत आहे. सदर स्पर्धा हि शहाजी विधी  महाविद्यालय, छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूर येथे होणार आहे. या स्पर्धेतून कांगडा, हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मिनी गटातील संभाव्य मुले व मुलींची निवड करण्यात येईल त्याच्या या यशाबद्दल तुलसी इंग्लीश स्कुल चे सेक्रेटरी प्रदीप रोडे सर, प्राचार्य उमा जगतकर मॅडम,  सय्यद फैसल सर, वर्गशिक्षक जोशी  मॅडम यांनी त्याचे अभिनंदन केले असुन स्पर्धेसाठी  शुभेच्छा दिल्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा