Subscribe Us

header ads

मुख्याधिकारी साहेब स्वच्छता विभागाकडे लक्ष द्या;नियोजन करा !

बीड स्पीड न्यूज 


मुख्याधिकारी साहेब स्वच्छता विभागाकडे लक्ष द्या;नियोजन करा !

नाल्या काढलेली घाण चार-चार दिवस उचलल्या जात नाही  

बीड (प्रतिनिधी) - नगर परिषद स्वच्छता विभागाचा कारभार पार ढेपाळला आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा आता बीड नगर परिषद चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी म्हणून नावलौकिक मिळविलेले उमेश ढाकणे यांनी जातीने लक्ष घालावे आणि स्वच्छता विभागाचा कारभार सुरळीत करावा अशी मागणी मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, बीड नगर परिषदेचा स्वच्छता विभाग स्वच्छते ऐवजी गलिच्छता पसरविण्यामुळे कुप्रसिद्ध झाला आहे. तीन-तीन, चार-चार महिने नाल्या न काढणे. काढल्यास चार-चार दिवस घाण उचलून न नेणे. घाण वेळेवर उचलून न नेल्यामुळे ती पसरून पुन्हा सर्वत्र गलिच्छता पसरणे. या सर्व बाबी आता बहुतेक बीड नगर परिषद स्वच्छता विभागाच्या अंगवळणी पडल्या आहेत. परंतु शहरात राहणाऱ्या शहरवासीयांच्या आरोग्याचे काय ? एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख मिळविलेले बीड नगरपरिषद चे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनीच आता स्वच्छता विभागाकडे जातीने लक्ष देऊन या विभागाकडून करण्यात येत असलेला हलगर्जीपणा, दिरंगाई व गलथान कारभाराला वेसन घालावी व या विभागाचा कारभार सुरळीत करावा. याकरिता आता नाली काढा म्हणण्यासाठी व काढलेली घाण उचलून न्या सांगण्यासाठी प्रत्येक वेळी मुख्याधिकाऱ्यांना निवेदने देण्याची वेळ शहरवासीयांवर आणू नये. स्वच्छता निरीक्षक, मुकादम किंवा स्वच्छता कर्मचारी हे सर्वजण नगरपालिकेत स्वच्छता विभागात पाहिजे त्या प्रमाणात कर्मचारी नाही. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. जे कर्मचारी आहेत त्यातून अनेक जण कामचुकार आहेत. नवीन भरती होत नाही. कामचुकारांकडून काम कसे करून घ्यावे. अशा एक ना अनेक तक्रारींचे तुणतुणे वाजवीत असतात. प्रभाग क्रमांक १४ मधील मुकादम साळवे हे तर रुजू झाल्यापासून आतापर्यंत प्रभागाच्या स्वच्छतेबाबत पुढाऱ्यांपेक्षा जास्त थापा मारून वेळ काढूपणा करत आहेत. त्यांची जबाबदारी असलेल्या प्रभागात दोन-दोन, तीन-तीन महिने नाल्या काढल्या जात नाही. काढल्यानंतर चार-चार दिवस घाण उचलली जात नाही. शहरातील अनेक भागात ज्या दिवशी नाल्या काढल्या जातात त्या दिवशी काढलेली घाण उचलल्या जात नाही. नाल्या काढल्यावर तीन-चार दिवसानंतर घाण उचलली जाते. अशा प्रकारे तीन-चार दिवस नाल्यातील घाण काढून रस्त्यांवर ठेवल्याने गल्लीत राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी, माशा, डास आणि गलिच्छतेचा सामना करावा लागतोय. हे पाहता ज्या दिवशी नाली काढणे व घाण उचलण्यासाठी स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपलब्ध असतील त्याच दिवशी नाल्या काढण्याचे नियोजन बीड नगर परिषदेकडून व्हायला हवे. अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा