Subscribe Us

header ads

प्रवीण सुरवसे या सामान्य कार्यकर्त्याने बुजवले खड्डे

बीड स्पीड न्यूज 


प्रवीण सुरवसे या सामान्य कार्यकर्त्याने बुजवले खड्डे

बीड दि.20 (प्रतिनिधी) शहरातील बार्शी रोड वरील सोमेश्वर नगर च्या कमानीच्या समोर ड्रेनेज पाइपलाइन साठी खड्डे खोदण्यात आले होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने महिनाभरापूर्वी सिमेंट ने खड्डे बुजवले होते. मात्र सिमेंट कमी आणि राख जास्त असल्याने अवघ्या काही दिवसातच त्या जागी मोठे खड्डे पडले.मागील पंधरा दिवस पाऊस पडल्याने खड्डे विस्तारले आणि वाहन धारकांना ये जा करताना प्रचंड त्रास सुरू होता.सोमेश्वर नगर भागात राहणाऱ्या प्रवीण सुरवसे या सामान्य कार्यकर्त्याने स्वतः च्या खर्चातून खड्डे बुजवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बार्शी रोडवरील सोमेश्वर नगर च्या कमानी समोरून वाहने कसे चालवायचे हा प्रश्न वाहन धारकांना पडत होता.तेथील खड्ड्यांमुळे नेहमी ट्रॅफिक जाम होत होती.अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते. सोमेश्वर नगर भागातील सामान्य कार्यकर्ते प्रवीण सुरवसे यांना याची दया आली आणि त्यांनी स्वखर्चातून जेसीबी लावून मुरूम टाकत खड्डे बुजवले. आता तेथील वाहतूक सुरळीत झाले असल्याने प्रवीण सुरवसे यांचे आभार मानले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा