Subscribe Us

header ads

शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर द्या- खा.शरदचंद्र पवार

बीड स्पीड न्यूज 


शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर द्या- खा.शरदचंद्र पवार

आ.संदीप क्षीरसागर यांनी घेतली कार्यकर्त्यांसह भेट


बारामती दि.२७ (प्रतिनिधी) :- आ.संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांसह दिवाळीनिमित्त बारामती येथील गोविंदबाग याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी खा.शरदचंद्र पवार यांनी परतीच्या पावसाने झालेल्या 

नुकसानीची विचारपूस केली व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर द्या अशा सुचना दिल्या. दरवर्षी प्रमाणे आ.संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांसह दिपावली व पाडव्या निमीत्त राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची बुधवार (दि.२६) रोजी 

बारामती येथील गोविंदबाग याठिकाणी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संवाद साधताना खा.शरदचंद्र पवार यांनी बीड मतदारसंघामध्ये, परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची विचारपूस केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर द्या. 

प्रशासनासोबत शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून घ्या. सरकारकडून सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा. अशा सुचना खा.शरदचंद्र पवार यांनी दिल्या. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, खा.सुप्रिया सुळे, आ.रोहीत पवार यांचीही आ.संदीप क्षीरसागर यांनी स्नेहभेट घेतली व दिपावली पाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा