Subscribe Us

header ads

30 वर्षीय यूवकाचा नव वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

माजलगाव — घरात खेळत असलेल्या नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 30 वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवार दि.13 रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.आरोपी विरोधात ग्रामीण पोलिसात पोस्को सह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपीला पकडले आहे .
          याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील एका गावातील घरामध्ये  मंगळवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान  दोन समवस्क  नऊ वर्षीय मुली खेळत होत्या.या वेळी त्या घरातील तीस वर्षीय युवक बाजूला उभा राहून हा खेळ पाहत होता . दरम्यान त्या दोन मुली तील एक मुलगी या युवकाची पुतणी ( भावाची मुलगी ) होती.यावेळी आरोपीची पुतणी असणारी मुलगी खेळ सोडून काही कामानिमित्त बाहेर निघून गेली.या दरम्यान आरोपीने घरात एकटीच असलेल्या त्या नऊ वर्षाच्या मुलीवर जबरदस्ती अत्याचार केला.काही वेळाने मुलीच्या आईने पीडित मुलीला रक्तस्त्राव झाल्याने इस्पितळात नेण्यात आले.यावेळी डॉक्टरांनी तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले . या झालेल्या प्रकरणाविषयी मुलीला विचारणा केली असता तिने या अत्याचार  केलेल्या यूवकाचे नाव सांगितले.दरम्यान पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को सह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरोपी पोलिसांनी पकडला आहे .या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि नीता गायकवाड या करत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा