Subscribe Us

header ads

अभिनेत्री करीना कपुर खान विरुद्ध बीडमध्ये पोलीस तक्रार दाखल

बीड-: गरोदरपणातील अनुभव आणि महिती देणारे एक पुस्तक बॉलिवुड अभिनेत्री करीना कपूर  हिने लिहिले असून हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले. आपल्या पुस्तकाला करीनाने  प्रेग्नसी बायबल  असे नाव दिल्याने आता नवीन वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी करीनाविरूद्ध बीडमध्ये अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने  तक्रार दाखल केली आहे.
करीना कपूरने ‘प्रेग्नसी बायबल’  या आपल्या पुस्तकाच्या नावात बायबल शब्द वापरल्याने बीडमधील अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने  आक्षेप घेतला आहे. पुस्तकावर बायबल शब्द वापरल्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या असून तो शब्द तात्काळ हटवावा, अशी मागणी ख्रिश्चन महासंघाने केली आहे.
बीडच्या  शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये  अल्फा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीवर अद्याप करीना कपूर किंवा पुस्तकाच्या प्रकाशकांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, याप्रकरणी रितसर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ख्रिश्चन महासंघाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा