Subscribe Us

header ads

*नगराध्यक्ष साहेब, वार्ड क्रं. ११ बीड नगर पालिका हददीत येत नाही का ??? शेख इफरोझ*

नगरसेवकांना लोकांचे हाल दिसेनात ?? आमदारांच्या या वार्डात गावखेडयासारखा रस्ता झाला आहे.*

बीड :- आमराई बालेपीर प्रभाग क्रं. ११ हा भाग मोठी लोकसंख्या असलेला भाग आहे या वार्डातील नगरसेवक पोटनिवडणुकीचा जिंकल्याच्या फायदा हा आमदार साहेबांना झालेला असतांनासुध्दा आमदार साहेब त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. या प्रभागात दोन मोठया शाळा व्यंकटेश पब्लिक स्कूल व इंदिरा गांधी ऊर्दू स्कूल हे असतानासुध्दा त्या वार्डातील रस्ता अतिशय खराब झालेला आहे या ठिकाणी मोठे खडडे व चिखल झाल्याने आतापर्यंत बरेच अपघात झालेले आहे. त्यामुळे येथील शाळेतील विद्यार्थी व नागरीकांना याचा नाहक त्रास होत आहे. सध्या नगरपालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते, नाल्या व इतर विकास कामे सुरु आहेत परंतू या वार्ड क्रं. ११ मधिल आमराई, चाऊस गल्ली व आघाव गल्ली या ठिकाणी विकासाठी दूजाभाव केला जात आहे असे येथील नागरीक सागतांना दिसत आहे येथील लाईट खांबावरील रात्रीच्या स्ट्रीट लाईटसुध्दा ब-याच दिवसापासून बंद आहे पाऊस पडल्यावर तर येथे वृध्द व बालंकाना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यांना पायी चालणे सुध्दा अवघड झालेले आहे. राजकीय वैमन्स्य वेगळी गोष्ट पण विकासाच्या दृष्टीकोनातून असे वागणे हे बुध्दीला न पटणारे आहे. आधी रस्ता करा त्यांनतर तुमचे राजकारण घरी करा असे येथील त्रस्त नागरीक सांगताना दिसत आहे. राजकारण बाजूला ठेवून येथील नागरीकांच्या समस्या लक्षात घेता येथील रस्ते होणे फार आवश्यक आहे. सदरील रस्ता बनविण्यासाठी ०५ कोटी निधी मंजूर झाल्याचे आणि लवकरच ८-१० दिवसांत काम सुरु होईल असे काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी येवून सागितले व तेथे नारळ सुध्दा फोडून उदघाटन केले आहे. परंतु प्रत्यक्ष कामास सुरुवात ही अद्यापही सुरु झालेली नाही. रस्ता तय्यार हा फक्त कागदावरच झालेला आहे का ? व त्याची बिले उचलली आहे का याबाबत मा. जिल्हाधिकारी, बीड यांनी चौकशी करावी असे सामाजिक कार्यकर्ते शेख इफरोझ यांनी निवेदनाव्दारे सांगितलेले आहे तसेच रस्त्याचे काम तात्काळ सुरु न झाल्यास उपोषणाला आम्ही बसणार आहे व कोर्टात आम्ही याचिका देखील सादर करणार आहोत आणि पुढच्या निवडणूकीत कोणत्याही नेत्याला या वार्डात मतदान मागण्यासाठी आम्ही येवू देणार नाही असे आमच्या प्रतिनिधीला शेख इफरोझ यांनी सांगितले.
निवडणूक आली की मतासाठी पुढाकार घेणारे नेते रस्ता बनविण्यासाठी का पुढाकार घेत नाही, रस्ता बनविण्याची मागणी येथील नागरीक ब-याच वर्षापासून करीत आहे. परंतू रस्ता बनविण्याच्या मागणीकडे सतत दूर्लक्ष केले जात आहे. बीड मधील रस्त्याचे कामे जोरात सुरु आहे परंतू वार्ड क्रं. ११ येथील रस्त्याचे काम हे राजकारणात अडकले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा