Subscribe Us

header ads

सांसे हो रही कम-पेड लगाएं हम

सांसे हो रही कम-पेड लगाएं हम


उम्मीद ट्रस्ट आणि जमात-ए-इस्लामी यांच्या तर्फे हजरत मुंडे पीर कब्रस्तानात वृक्षलागड /वृक्षारोपणास सुरुवात



अंबाजोगाई प्रतिनिधी:- मोहंमद ताहेर

आज दिनांक ११ जुलै २०२१

दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसगिर्क साधनसंपत्तीचा नाश होत असल्याने तापमानवाढ आणि हवामानतही बदल घडु लागले आहे यासर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे हवामान बदलत चालले आहे

यावर उपाय म्हणुन पर्यावरणाचे संवर्धन जतन व संरक्षण करुन समुध्द व संपन्न शहराची भौतिक निर्मिती करणे ही काळाची गरज माणुन अंबाजोगाई शहरातील हजरत मुंडे पीर कब्रस्तान पासुन वृक्षलागवडीला सुरुवात करण्यात आली आहे

यंदाच्या पावसाळ्यात अधिकाधिक झाडे लागावीत यासाठी उम्मीद ट्रस्ट आणि जमात-ए-इस्लामी व शहरातील सर्वच घटकांनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास सहभाग नोंदविला या सहभागाला शहरातील वृक्षारोपणाला निश्चितपणे गती लाभेल.यंदाच्या पावसाळ्यात वृक्षारोपणाचा भरीव कार्यक्रम संपुर्ण शहरात हाती घेण्याचे नियोजन उम्मीद ट्रस्टच्या अध्यक्ष डाॅ.लतीफ सर,जमात-ए-इस्लामीच्या अमीर मुजीब सर व संपुर्ण टिमच्या वतीने ५०००/- हजार वृक्षलागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे

शहरातील हजरत मुंडे पीर कब्रस्तानात आजपासुन ५० लिंब वृक्षलागवडाचे कार्यक्रमास सुरुवात झाली

पावसाळ्यात अधिकाधिक वृक्षलागवड व्हावी यासाठी जनतेनेही या कामी सक्रिय योगदान देणे गरजेचे असुन नागरिकांनी शहरातील परिसरात अधिकाधिक झाडे लावुन वृक्षलागवड यशस्वी करण्यात पुढे यावे.

हजरत मुंडे पीर कब्रस्तान येथील वृक्षारोपणाच्या/वृक्षलागवड कार्यक्रमास 

उम्मीद ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ.लतीफ सर,जमात-ए-इस्लामीचे अमीर मुजीब सर,असद भाई,अमजत भाई गवळी,जहाॅंगीर भाई पठाण,अॅड.इस्माईल गवळी,कलीम भाई,युनूस भाई,साजेद सर,साईनाथ तुपरे,दगडुदादा लोमटे,वृक्षमित्र-  किरदन सर,निकम सर,देशमुख सर,फहद सर,मोहंमद ताहेर भाई,शेख बाबा भाई,वाजेद भाई,नदिम भाई,माजेद भाई,शफिक भाई,इत्यादींनी वृक्षलागवड कार्यक्रमास अधिकाधिक झाडे लावण्याचे नियोजनास सुरुवात करण्यात आलेली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक