आदित्य कृषी शिक्षण संस्थेत वृक्षारोपण करून कृषिदिन संपन्न
आदित्य शिक्षण संस्था, बीड येथील आदित्य कृषी महाविद्यालय , कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय , अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय व जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदिन साजरा करण्यात आला आज जगभरात कोविड-१९ (कोरोना) या विषाणूने थैमान घातले असल्याने सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून सारू केली जाते. महाराष्ट्र शासनाने कृषी दिन हा १ जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो. त्यानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेल्या दिलेल्या सूचनेनुसार कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला आहे. त्यानिमित्त दिनांक १ जुलै रोजी महाविद्यालय प्रक्षेत्रावर आंबे, सीताफळ, मोसंबी, बोर वृक्ष लागवड करून कृषी दिन साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. अरुण मुंडे, (प्राचार्य आदित्य कृषि महाविद्यालय), प्रा. श्याम भुतडा (प्राचार्य आदित्य कृषि अभियंत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय),डॉ. कचरे सतिश (प्राचार्य आदित्य जैव तंत्रज्ञान महाविद्यालय), व प्रा. नागरगोजे के.डी, (प्राचार्य आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. संजय लोखंडे, प्रा. घोडके, प्रा.खांडेकर, प्रा. ठमके यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमास प्राध्यापक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या