Subscribe Us

header ads

शेख इरफान शे. शब्बीर ला मारणाऱ्या दारव्हा पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतेतुन

शेख इरफान शे. शब्बीर ला मारणाऱ्या दारव्हा पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतेतुन
बडतर्फ करुन मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा- अकबर कच्छी*


परळी: प्रतिनिधी-: शेख इरफान शे.शब्बीर वय 32 वर्षे रा. रेल्वेस्टेशन, दारव्हा ता. दारव्हा जि. यवतमाळ हे आपल्या दोन मित्रासह दैनंदिन कामाकरिता घराबाहेर गेलेले असतांना दिनांक 06/07/2021 रोजी दारव्हा पोलिसांनी सदर तीनही व्यक्तीविरुध्द कोणतीही तक्रार व गुन्हा नसताना पकडुन पोलीस स्टेशन दारव्हा येथे

नेले व अमानुषनित्या बेदम मारहाण केली. पोलिस कर्मचारी दानवे जमादार, सचिन जाधव, संजय मोहतुरे, शब्बीर पाप्पुवाले यांनी (इरफान) यास लाथा - बुक्यांनी व काठीने बेदम मारहाण केली या मारहाणीत शेख इरफान याचा पोलिस स्टेशन दारव्हा मध्ये मृत्यु झाला. उपचाराचा देखावा निर्माण करण्यासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता तेथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्याला मृत्यु घोषीत केले. मृतकाची यापुर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तसेच दिनांक 06 जुले 2021 रोजी मृतकाविरोधात दारव्हा पोलिस स्टेशन डायरी वर गुन्हा व तक्रार नसतांना मृतकास दारव्हा पोलिसांनी लक्ष करुन का जीवे मारले? मृतक हा अत्यंत गरीब कुटुंबाचा सदस्य आहे तसेच आपल्या परिवारातील एकमेव कमावता व्यक्ती असल्याने संपूर्ण परिवार आधारहीन झाले आहे म्हणून  मी आपणास खालील मागण्या करतो.

1) वरील पोलिस कर्मचारी दानवे जमादार, सचिन जाधव, संजय मोहतुरे, शब्बीर पाप्पुवाले

यांना सेवेतुन बडतर्फ करुन यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

2) मृतकाच्या कुटूंबियांस आर्थीक मदत म्हणुन 20 लक्ष रुपये त्वरीत देण्यात यावे.

3) सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी.

करीता आपल्या सवेशी निवेदन सादर. 

हे जर सर्व मागण्या मान्य नाही झाले तर खा. इम्तियाज जलील साहेब, डाॅ.गफ्फार कादरी साहेब, फेरोज लाला साहेब याच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक