Subscribe Us

header ads

राज्य समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे आउटस्टँडिंग प्रोफेसर अवार्ड ने सन्मानित -प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी केला सत्कार

औरंगाबाद-: दिनांक 8 ऑगस्ट 2021 फुले आंबेडकर  विद्वत  सभेचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक व संशोधन कार्या मध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे आंतरराष्ट्रीय आउटस्टॅंडिंग प्रोफेसर अवार्ड देऊन सन्मानित केले आहे . त्यांना मिळालेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या हस्ते औरंगाबाद या ठिकाणी फुले-आंबेडकर विद्वत सभेच्या राज्यस्तरीय चिंतन बैठकीमध्ये सत्कार करण्यात आला . यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता फारूक अहमद, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकासे ,राज्य उपाध्यक्ष प्रा गोविंद दळवी ,महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष सवीता मुंडे, मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल, फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ मनोज निकाळजे, औरंगाबाद येथील मराठवाडा विभागीय समन्वयक डॉ प्रज्ञा साळवे, प्रा भारत शिरसाट , वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष योगेश बन  तसेच महाराष्ट्र राज्यातील फुले-आंबेडकर विद्वत सभेचे विभागीय समन्वयक आणि जिल्हा समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा