Subscribe Us

header ads

आयकर विभागामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राविण्यधारक खेळाडूंसाठी विविध पदांच्या भरती

बीड,दि.2 (जि.मा.का.):- केंद्र शासन्नाच्या आयकर विभागाद्वाराराष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंकरीता विविध पदांच्या खेळाडू भरतीचा कार्यक्रम जाहिरात दि. 08 जुलौ 2021 अन्न्वये प्रसिध्द झाला आहे. संदर्भीय जाहीरातीमधील परिच्छेद 2 मध्ये पात्र खेळप्रकार नमुद केले असून्नपरिच्छेद 3 मधील मुदा क्रमांक (iii) अन्वये भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्याशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू पात्र ठरणार आहेत.

            या खेळाडू भरतीच्या अनुषंगानेराज्यभरातून अनेक खेळाडू संचालन्नालयात राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी प्रमाणित करुन्न घेण्यासाठी व्यक्तिश: उपस्थित राहून अर्ज दाखल करीत आहेत. राज्यातील कोविड-19 विषाणूंच्या प्रादुर्भावाचा विचार करताराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी प्रमाणीत करुन घेण्यासाठी राज्यातील खेळाडूंनी पुणे येथे व्यक्तीश: उपस्थित राहणे धोक्याचे ठरु शकते.  यास्तव आयकर विभागाच्या खेळाडू भरतीसाठी इच्छुक असणा-या बीड जिल्हयातील पात्र खेळाडूंनी कामगिरी प्रमाणित करुन घेण्यासाठीचे अर्ज परिच्छेद 2 व परिच्छेद 3 मधील मुददा क्रमांक (iii) अन्न्वये पात्र असलेल्याभारतीय शालेय खेल महासंघाद्वारा आयोजितराष्ट्रीय शालेय स्पर्धेतील सहभागी व प्राविण्यधारक खेळांडून्नी प्रस्ताव दि.13/08/2021 पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयबीड येथे सादर करावेत.

            अधिक माहितीसाठी श्रीमती सुप्रिया गाढवे (तालुका क्रीडा अधिकारी ) मो.क्र.83087922661 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहनजिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर  यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा