Subscribe Us

header ads

जनतेने कर सगळा भरावा, हेल्मेट सक्ती हवी, वाहनांची कागदपत्रे पुर्ण हवीतमग सुविधा पुर्ण का नाही? - अशोक ढोले पाटील

बीड (प्रतिनिधी):- नगर परिषद प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सुरु असून न.प. प्रशासन कोणत्या ना कोणत्या कारणाने नागरिकांना त्रास देत आहे. नुसती आश्वासनांची खैरात पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाहीच. हे धोरण असे की, नागरिकांनी पुर्ण नियम, अटींची पुर्तता करावी पण सुविधा मागायच्या नाहीत? हा अन्यायकार प्रकार नागरिक जास्त काळ सहन करणार नसून येणार्‍या काळात नक्कीच या गोष्टीचा फटका सत्ताधार्‍यांना बसणार यात शंकाच नाही. बार्शी नाका ते मोमीनपुरा रस्त्याच्या आजुबाजूला प्रचंड घाण निर्माण झाली असून  दुर्गंधीने आरोग्य बिघडत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमधून होत आहे. बार्शी नाका ते मोमीनपुरा हा रस्ता मुख्य बाजारपेठेला जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर रहदारी जास्त प्रमाणात असून येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांसहित तेथे वास्तव्य करणार्‍या नागरिकांना रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांचा तर सामना करावाच लागतो. तसेच याचबरोबर रस्त्याच्याकडेला घाणीचे ढिगारे साचलेले  असल्याने यामुळे दुर्गंध पसरत असून या गंभीर बाबीकडे प्रशासन  जाणुनबुजून दुर्लक्ष करत आहे. जनतेलला  छळलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार येणार्‍या निवडणुकीत केला जाईल. जनेतेने न.प.चे सर्व कर भरायचे अन् सेवा देताना तुघलकी धोरण करायचे ये बात कुछ हजम नही हूई असे पत्रकातून सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले पाटील यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा