Subscribe Us

header ads

बलात्कार प्रकरणी ५ अटकेत

कर्नाटक-: म्हैसुरु येथे एमबीए करणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. अटकेत असलेल्या आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असून एक आरोपी फरारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.म्हैसुरु येथील चामुंडी टेकडी परिसरात आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणीवर २४ ऑगस्ट रोजी रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला. परराज्यातील असलेली ही तरुणी म्हैसुरु येथे एमबीएचे शिक्षण घेत आहे. या घटनेनंतर पोलिसांची पाच पथके तपासासाठी तयार करण्यात आली होती. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पाच आरोपींना अटक करण्यात यश आल्याचे कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी सांगितले. आरोपी तमिळनाडू राज्यातील तिरुप्पूर येथील असून म्हैसुरु येथे ते कामासाठी आले होते. ते वाहनचालक, सुतारकाम, रंगारीकाम अशा प्रकारची कामे करतात, अशी माहिती सूद यांनी दिली.या घटनेनंतर तरुणीला जबरदस्त मानसिक धक्का बसला असून या धक्क्यातून ती आता सावरत आहे. पोलिसांनी तिची आणि तिच्या मित्राची जबानी घेतली आहे. मात्र त्यांनी दिलेली माहिती अपुरी असून गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पुरेशी नाही. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी गुन्ह्यातील तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे शोधून काढले आहेत, अशी माहिती सूद यांनी दिली.आरोपींनी या तरुणी आणि तिच्या मित्राकडून तीन लाख रुपयांची मागणी करत चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र त्या संदर्भात तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही पुन्हा या तरुणीचा जबाब नोंदवणार आहोत, त्याशिवाय न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अतिरिक्त माहिती मिळू शकते. त्याआधारे लवकरच आरोपपत्र सादर करू, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा