Subscribe Us

header ads

ॲड. मोहम्मद खान यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केला अल्पसंख्यांक सेल चा कार्यअहवाल

मुंबई (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक सेल चे प्रदेशाध्यक्ष ॲड. मोहम्मद खान पठाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित दादा पवार यांच्या कडे अल्पसंख्यांक सेल चा कार्य अहवाल सादर केला. यावेळी छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रवादी पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यापासून ॲड. मोहम्मद खान पठाण हे मोठ्या धडाडीने कार्य करत आहेत. या पदावर त्यांची नियुक्ती जानेवारी 2021 पासून झालेली असून तेव्हापासून ते आतापर्यंत संपूर्ण राज्यभर अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रश्नांचा अभ्यास करून तळागाळातील समाजात जातीने पोहोचत विविध समस्या जाणून घेऊन त्याची नोंद घेत त्यांनी त्यांच्या या कालावधीतील कार्यअहवाल तयार करून पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ना. दिलीप वळसे-पाटील, ना. छगन भुजबळ या मंत्र्यांच्या उपस्थितीत सादर केला. हा अहवाल पाहून सर्व मंत्र्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत अभिनंदन केले. तसेच यापुढेही त्यांनी अशाच प्रकारे सर्वाभिमुख कार्य सुरू ठेवावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच त्यांच्याकडून अशाचप्रकारे चांगल्या कार्याची अपेक्षा असल्याचेही नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा