Subscribe Us

header ads

बीड नगर परिषद येथील अतिरिक्त पदभार बाबतचे आदेश रद्द करण्याचे जिल्हाधिकारी याचे आदेश...वंचितचे अजय सरवदे यांच्या तक्रारी ची दखल


 बीड प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


बीड(प्रतिनिधी) नगर परिषद बीड येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत गुंठेवारी कायदा प्रकरणामध्ये गुंठेवारीच्या एक फाईलचा दर 6000 ठरवून कामे करत सर्वसामान्य नागरिकांची लूट चालवली जात असल्याची तक्रार वंचितचे अजय सरवदे यांनी जिल्हाधिकारी बीड यांना केली होती. तसेच नियमितपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास बाजूला ठेवून राजकीय वरदहस्त असणारे सरकारी कर्मचारी सय्यद सलीम सय्यद याकूब यांची मूळ प्रतिनियुक्ती पाटोदा या ठिकाणी असताना मा.मुख्याधिकारी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बीड नगर परिषद या ठिकाणी नियमबाह्य प्रतिनियुक्ती दिलेली होती. सर्वसामान्य जनतेच्या लूट थांबवावी व सय्यद सलीम सय्यद याकूब यांना पाटोदा या मूळ ठिकाणी पाठवून नियमित काम करणाऱ्या कर्मचारी यांचेकडे चार्ज देण्यात यावा अशी मागणी वंचितच्या वतीने केली होती.
प्रकरणी जिल्हाधिकारी बीड यांनी तातडीने राजकीय वरदहस्त असणाऱ्या कनिष्ठ रचना सहाय्यक सय्यद सलीम सय्यद याकूब कनिष्ठ नगर रचना विभाग पाटोदा यांचे बीड नगर परिषद येथील अतिरिक्त पदभाराचे आदेश रद्द केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा