Subscribe Us

header ads

अल्पसंख्यांक समाजातील मुलीवर अत्याचार करणारास कठोर शासन करा - मोहम्मद खमरोद्दिन


(बीड प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात अलीकडील काळात अल्पसंख्यांक समाजातील मुलीवर अत्याचाराच्या घटनात वाढ झाल्याचे दिसून येत असल्याने शासनाने अत्याचार करणाऱ्या आरोपीस कठोर शासन करण्याची मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष मोहम्मद  खमरोद्दिन यांनी केली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदनात खमरोद्दिन यांनी म्हणले की बीड जिल्ह्यात काही दिवसात अल्पसंख्यांक समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याच्या घटनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सिरसाळा सुर्डी चुंबळी फाटा आदी ठिकाणी अन्याय होऊन ही आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याने अशा घटनांमुळे अल्पसंख्यांक समाजात  असुरक्षितेची भावना निर्माण होत असल्याचे अन्याय व अत्याचार करणाऱ्या आरोपीना कठोर शासन करून अन्यायग्रस्त कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली. यावेळी शेख इसाक शेठ सय्यद शेरू भाई इर्शाद खान इलियास सिद्दिकी सय्यद मुजाहेद सय्यद एजाज मोमीन नय्यर आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा