Subscribe Us

header ads

अनिल देशमुख यांच्या हॉटेलवरही ‘ई.डी.’चा छापा.

 
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या महाविद्यालयावर धाड टाकल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ई.डी.)  त्यांच्या वर्धा मार्गावर असलेल्या ट्रव्होटेल हॉटेलवरही छापा टाकला. 
यादरम्यान अधिकाऱ्यांनी हॉटेलच्या व्यवस्थापकाला चौकशीसाठी नेल्याची माहिती सूत्रांनी दिली.  
देशमुख यांनी दिल्ली येथील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या श्री शिक्षण संस्थेत सव्वाचार कोटी रुपये वळवल्याच्या माहितीच्या आधारे ई.डी.ने  ते अध्यक्ष असलेल्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एन.आय.टी.) महाविद्यालयावर छापे टाकले.
  दुपारी ई.डी.चा ताफा थेट वर्धा मार्गावर असलेल्या देशमुख यांच्या हॉटेलात धडकला. 
ट्रव्होटेल हॉटेलमध्ये जवळपास दोन तास त्यांनी तपास केला. 
त्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापकाला चौकशीसाठी आपल्यासोबत नेल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. 
देशमुख यांना चार वेळा ई.डी.ने समन्स बजावले आहेत. 
मात्र देशमुख यांनी त्याची दखल घेतली नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक