Subscribe Us

header ads

लग्नाचे आमिष दाखवून विधवा महीलेवर अत्याचार!!

अंबाजोगाई-: येथील वीस वर्षीय विधवा महीलेवर लग्नाचे आमिष दाखवून सतत अत्याचार केल्याची घटना शहरात घडली. याबाबत पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली असुन आरोपी फरार झाला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की वीस वर्षीय विधवा महीला पतीच्या निधनानंतर दोन वर्षापासून आई- वडीलांकडे राहते माझे आई वडील दूसर्याचे शेतात काम करून उपजिवीका भागवितात. आमचे शेजारी राहणारी 30 वर्ष वयाची महिला राहत असून तिच्या सोबत आमचे घरगूती संबंध होते. तिचा भाऊ गजानन मदनराव पेटकर वय २८ वर्ष व्यवसाय चालक रा. गंगाखेड जि. परभणी हा अधूनमधून तिच्याकडे राहण्यासाठी येत होता.सन २०१५ मध्ये माझे लग्न रा. गांधीनगर अंबाजोगाई यांचेशी झाले होते. मला अडीच वर्षाची मूलगी आहे.शेजारणीकडे जानेवारी २०२० मध्ये तिचा भाऊ गजानन मदनराव पेटकर हा राहण्यास आलेला असताना त्याने मला लग्नाची मागणी घातलेली होती. माझ्या आई वडीलांना तसेच त्याच्या विहणीला व आईला सुद्धा मी पसंत असल्यामूळे माझे आई वडीलांनी आमचे लग्न करावयाचे ठरविले होते. तिचा भाऊ गजानन मदनराव पेटकर वय २८वर्ष व्यवसाय चालक रा. गंगाखेड जि. परभणी हा अधूनमधून तिच्याकडे राहण्यासाठी येत असे.सन २०१५ मध्ये माझे लग्न रा. गांधीनगर अंबाजोगाई यांचेशी झाले होते. मला अडीच वर्षाची मूलगी आहे.
शेजारनीकडे जानेवारी २०२० मध्ये तिचा भाऊ गजानन मदनराव पेटकर हा राहण्यास आलेला असताना त्याने मला लग्नाची मागणी घातलेली होती. माझ्या आई वडीलांना तसेच त्याच्या विहणीला व आईला सुद्धा मी पसंत असल्यामूळे माझे आई वडीलांनी आमचे लग्न करावयाचे ठरविले होते. परंतू  लॉकडाऊनमूळे सद्या त्याला काही पोटापाण्याच व्यवसाय नसल्यामूळे कामधंदा मिळाल्यानंतर आमचे लग्न करण्याचे आमच्या घरच्यांनी ठरविले होते.
आमचे लग्न ठरले असल्यामुळे त्यांच्या घरी छोटे मोठे काम करण्यासाठी मी जात असे. दि २५ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी दोन वाजण्याचे सूमारास मी गजानन पेटकर हा घरी असताना गेले असता त्याने एकांताचा फायदा घेवून माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली परंतू मी त्याला नकार दिला, तरी त्याने मला आपण लवकरच लग्न करणार आहोत असे बोलत माझी ईच्छा नसताना जबरदस्तीने माझ्याशी शरीरसंबंध केले. लाजेखातर हि गोष्ट मी आई वडीलांना सांगितली नाही. त्यानंतर तो रोजच मला लग्नाचे आमीष दाखवत माझ्याशी शरीरसंबंध करीत होता.
गजानन पेटकर काम मिळालेचा बहाना गावाकडे गेला २२ एप्रील २०२१ रोजी लग्न केले असल्याची चर्चा परीसरात ऐकल्याने मला त्याचे लग्न झाल्याचे समजले, त्याला भेटायला बोलावून त्याने केलेल्या लग्नाबाबत समक्ष विचारले असता त्याच्या आईने त्याचे लग्न जबरदस्तीने करून दिले असल्याचे सांगून तो माझ्याशी पून्हा लग्न करायचे आहे असे सांगितले.तरी गजानन मदनराव पेटकर वय २८ वर्ष व्यवसाय चालक रा. गंगाखेड जि. परभणी यांनी मला लग्नाचे आमीष दाखवून गजानन पेटकर याने माझ्याशी त्याची बहिणचे घरात माझ्याशी वारंवार जबरदस्तीने शरिरसंबध करून व माझ्याशी लग्न न करता दूसर्या मूलीशी लग्न केले.
या आशयाची तक्रार सदर पीडीतेने अंबाजोगाई शहर पोलीसात दिली असुन आरोपी पेटकर विरुध्द कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असल्याचे विशेष तपास अधिकारी पवार यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा