वार्षिक अनुदानाची रक्कम ३० लाखावरून ६० लाख ऐवढी करणार
मंत्रालयात नशाबंदी मंडळ या संस्थेच्या अनुदान व कामकाजा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीस अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव दि.रा. डिंगळे आदिसह नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष माजी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ राजेंद्र वेळुकर, कार्याध्यक्ष आयुक्त आर.के. गायकवाड, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, कार्यकारिणी सदस्य प्रिया पाटील, डॉ. प्रभा तिरमारे, प्रिया पाटील हे उपस्थित होते.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, नशाबंदी हा संवेदनशील विषय असून, याबाबत तरुणांमध्ये जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे.
२०२०-२१ या आर्थिक वर्षातील एकूण देय अनुदानापैकी १४.८५ हजार इतके अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहिम आणि व्यसनाधिन व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी स्वयंसेवी संघटनांना तीन कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.
व्यसनमुक्ती धोरणाअंतर्गत प्रत्येक महसुली विभागास दोन याप्रमाणे व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये कार्य करणा-या १२ संस्थांना प्रत्येकी ११ लाख अशी एकुण एक कोटी ३२ लाख याचबरोबर राष्ट्रीय महात्मा गांधी पुरस्कार व सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तीन कोटी रक्कम वितरीत करण्यात येत असल्याचे श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले
0 टिप्पण्या