Subscribe Us

header ads

कारच्या धडकेत मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू

परळी-:परळीहून पांगरीकडे चाललेल्या मोटारसायकल स्वारास कारने जोराची धडक दिल्याने . यामध्ये तरुण गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाला. ही घटना परळी ते तळेगाव रस्त्यावर घडली. या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मयताचे नातेवाईक ग्रामीण पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले होते.प्रमोदय भगवान तांदळे रा. सारडगाव ता. परळी हा तरुण मोटारसायकलवरून परळीहून पांगरीकडे जात होता. त्यास तळेगाव जवळ एका कारने जोराची धडक दिल्याने यात तो गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाला. ही घटना रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अद्यापही कार चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला नसल्याने मयताचे नातेवाईक गुन्हा दाखल करण्यासाठी परळी ग्रामीण ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा