Subscribe Us

header ads

रा गे शिंदे महाविद्यालयातील डॉ अरुण खर्डे, डॉ राहुल देशमुख यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता.


 प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे

परंडा-  दिनांक 31 ऑगस्ट 2021 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ अरुण खर्डे आणि ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाने मान्यता दिली आहे.डॉ अरुण खर्डे यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये तर डॉ राहुल देशमुख यांना ग्रंथालयाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. दोघांच्या नियुक्तीबद्दल श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर  अध्यक्ष सुनील शिंदे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे ,महाविद्यालयाचे स्टॉप सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे, आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने आणि महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .तसेच डॉ खर्डे व डॉ देशमुख यांच्या मित्र परिवारांनी कौतुकाचा वर्षाव केला.या दोघांनाही चार विद्यार्थी घेऊन त्यांना मार्गदर्शन करता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा