Subscribe Us

header ads

आज वाकनाथपुर येथील सेना .भाजप कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश


प्रतिनिधी नवनाथ गोरे मो 9823310880



(वाकनाथपुर प्रतिनिधी) आज दि.२६/८/२०२१ रोजी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा श्री अमरसिंहजी पंडित साहेब यांच्या नेतृत्वाखाली वाकनाथपुर येथील सेना भाजप चे सरपंच. उपसरपंच युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे
यामध्ये. सरपंच गोरख घाडगे. युवा कार्यकर्ते लक्ष्मण खाकरे. उपसरपंच सुधाकर कानडे. नवनाथ गोरे. जनार्दन भंडारे .शेख शौकत. गोवर्धन भंडारे .गणेश खाकरे .राजू कानडे नामदेव गोरे. भास्कर खाकरे. रामा कानडे .शिवाजी कानडे. सिद्धेश्वर खाकरे. पांडुरंग कानडे .गणपत घाडगे दामोदर अण्णा खाकरे. नवनाथ खाकरे. आदीनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मा श्री अमरसिंहजी पंडित साहेब बोलताना म्हणाले की गावात येण्यासाठी नदिवर्ती पुल हवा आहे. पूर्ण नसल्याकारणाने नदीला पाणी आल्यानंतर दळणवळण बंद पडत आहे.तसेच वाकनाथपुर गावांचा संपर्क तुटतो पण पूल होणे ही खूप गरजेचे आहे त्या पेक्षा ही गरजेचे आहे नदीचे पाणी अडवून ठेवण्याचे नदीचे पाणी जर अडवले तर शिवारातील सर्व शेती-बागायती होईल शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर पैसे मिळेल गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल मी फक्त आश्वासन देत नाही करून दाखवतो तुमच्या पूलाचे काम मार्गी लावण्याचे आणि नदीचे पाणी अडवण्यासाठी लवकरात लवकर बांधण्याचा मी प्रयत्न करेल सत्ता नसल्याकारणाने उशीर लागेल पण काम मात्र नक्की होईल आता राजकारणाच्या गोष्टी बोलायच्या नाहीत आता फक्त विकासाच्या गोष्टी बोलायला हव्यात आणि मी बोलतो ते करुन दाखवणार आहे. असे कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते या कार्यक्रम प्रसंगी राधाकिसन अबुज सरपंच रंजेगाव. अशोक बाप्पू लांडे माजी सरपंच ब्रहमपुर. अशोक ढास सरपंच माळापुरी. गणेश कदम सरपंच शिदोड. वशिष्ठ कुटे सरपंच कुक्कडगाव. राधाकिसन पटेकर कुर्ला. चंद्रसेन पडूळे औरंगपूर. आदी मान्यवरांची उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालक बी. सोनवणे. सर यानी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा