Subscribe Us

header ads

अंबाजोगाईतील त्या वीटभट्टी चालकाचा खून झाल्याचे निष्पन दोघांवर गुन्हा दाखल


अंबाजोगाई : शहरातील खोलेश्वर प्राथमिक शाळेजवळील छल्ला भागात राहणारे फारुख लतीफ मोमीन (वय ४२) मागील दोन दिवसापासून बेपत्ता झाले होते. फारुख लतीफ मोमीन यांची धायगुडा पिंपळा दूरदर्शन केंद्राजवळ वीटभट्टी आहे. रविवारी (दि.२२) सायंकाळी ते मित्रासोबत जेवायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांचा संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेऊनही ते सापडले नव्हते. मंगळवारी त्यांच्या मुलाने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मंगळवारी (दि.२४) दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह अंबाजोगाई परळी रोडवर वरवटी-पिंपळा शिवारात पुलाजवळ सापडला. त्यानंतर बर्दापूर पोलिसांनी अतिशय वेगवान तपास करत अवघ्या २४ तासात या खुनाचा उलगडा केला असून मारुती उर्फ वाघ्या हनुमंत चाटे (रा. वरवटी, ता. अंबाजोगाई) यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मोमीन नाजेश फारुख  यांच्या फिर्यादीवरून वाघ्या चाटे आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा