Subscribe Us

header ads

काकू नाना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या मोफत शस्त्रक्रिया- डॉ. समीर शेख आ.संदीप क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन

बीड (प्रतिनिधी):- बीडकरांना ज्या उचारासाठी पुणे, मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरात वणवण फिरावे लागत होते ते उपचार आणि त्याच सुख-सुविधा बीडकरांना बीडमध्येच मिळाव्यात या उद्देशाने बीड कर्तव्यदक्ष आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरात काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल व मोतिरामजी वरपे कार्डियाक युनिटची उभारणी केली आणि अवघ्या काही दिवसांतच या हॉस्पिटलने बीड जिल्हावासियांचा विश्वास संपादन करत आतापर्यंत अनेक रुग्णांना उच्च प्रतीचे उपचार देऊन निरोगी करण्याचे उल्लेखनीय काम केले आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरातील काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल व मोतिरामजी वरपे कार्डियाक युनिटमध्ये २७ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर या दरम्यान एक महिण्यासाठी मणक्या दरम्यानच्या मोफत शस्त्रक्रियांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मणक्या दरम्यान सरकलेल्या गाद्या तसेच मणक्या दरम्यान दबलेली शीर याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती या हॉस्पिटलमधील सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ समीर शेख यांनी दिली आहे. आजवर काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल व मोतिरामजी वरपे कार्डियाक युनिटमध्ये मेंदू मणक्याचे तब्ब्ल २०० यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. बीडमधील मणक्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी जास्तीत जास्त संख्यने या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल व मोतिरामजी वरपे कार्डियाक युनिटचे अध्यक्ष आ. संदीप क्षीरसागर, संचालक डॉ बालाजी जाधव, अजित वरपे, वैद्यकीय संचालक डॉ. सचिन आंधळकर तर प्रशाकीय अधिकारी सय्यद बशीर यांनी केले. रुग्णांनी आपल्या नावाची नोंदणी करण्याकरीता ९४०४०२२७७७ या मोबाईल वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा