Subscribe Us

header ads

हनुमान महाराज गिरी यांना अटक


(गेवराई प्रतिनिधी) बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी कोळगाव येथील सूर्यमंदिर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे. बीडच्या सत्र न्यायालयाने महाराजांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर  फरार झालेल्या या महाराजाने आत्महत्येचा इशारा दिला होता.  आज सकाळी  गेवराई पोलीस उपअधिक्षक यांच्या पथकाने महाराज यांना अटक केली आहे. या महाराजांच्या विरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाती जमाती अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर केला होता. आणि या व्हिडिओत  त्याने सांगितले होते.माझ्या मृत्यूला काही राजकीय मंडळी पत्रकार,  पीडित कुटुंब जबाबदार आहे.  अवघ्या पाच मिनिटात मी  गळफास लावणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल करून  हनुमान महाराज गिरी फरार झाले होते. पोलीस प्रशासन त्यांचा तीन दिवस शोध घेत होते. महाराजांच्या नातेवाइकाकडून हनुमान महाराज जिवंत असल्याची पुष्टी पोलिसांना झाल्यानंतर शोध मोहीम थांबवली  हनुमान महाराज गिरी यांनी दोन दिवसापूर्वी बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर सुनावणी झाली न्यायालयाने हनुमान महाराज गिरी यांना अटकपूर्व जामीन द्यायला  नाकार दिला महाराज यांच्या अडचणीत वाढ झाल्याने यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद याठिकाणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला मात्र खंडपीठानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. 
आणि आज दोन दिवसानंतर एका ठिकाणावरून हनुमान महाराज गिरी यांना गेवराईचे उपअधीक्षक सोप्रिल  राठोड यांच्या सूचनेवरून चकलंबा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना गेवराई  च्या न्यायालयासमोर हजर केला जाणार आहे. अशी माहिती चकलंबा पोलिसांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा