Subscribe Us

header ads

कोरोना हि लस सुरक्षित आहे रेखाबाई अंधापुरे कुमारी भारती ताई अंधापुरे सह राणीताई माळवे



बीड प्रतिनिधी-: सध्या जगामध्ये कोरोना महामारी च्या संकटाने थैमान घातले असून या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार तर्फे आणि राज्य सरकार तर्फे ठिकाणी चांगल्या प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि लसीकरणाची ही अत्यंत चांगल्या प्रकारची व्यवस्था सरकार कडून करण्यात आलेली आहे असे असताना काही लोक कोरोना लसीच्या संदर्भामध्ये विविध चर्चा करत आहेत लस घ्यावी का ना घ्यावी अशा प्रकारच्या चर्चेला सध्या बीडमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच उधाण आलेले आहे असे असताना  बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत चंपावती शाळा नगर रोड बीड या ठिकाणी बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष असणारे कर्तव्यनिष्ठ शैल्य चिकित्सक श्री सुरेश साबळे साहेब यांनी ही व्यवस्था केलेली आहे असे आज कोरोना लस घेतल्यानंतर दैनिक न्याय टाइम्स शी बोलताना  रेखा बाई अंधापूरे आणि कुमारी भारती ताई  अंधापुरे सह राणी ताई माळवे यांनी ही व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारची या ठिकाणी लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच तरुण वर्गातील लोकांसाठी तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी महिलांसाठी सर्व अठरा ते चौरे 40 वयोगटातील बंधू आणि भगिनी साठी देखील ही खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था या चंपावती शाळेमध्ये जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे म्हणून ही उत्तम आणि उत्कृष्ट सुरक्षित ही लस आहे ही भारतीय लस असून या लसीच्या बाबतीत कोणीही किंचितही आपल्या मनामध्ये शंका निर्माण करू नये सर्वांनी ही सुरक्षित उत्कृष्ट असणारी लस घ्यावी आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे तसेच जिल्हा आरोग्य प्रशासनाचे जिल्हा प्रशासनाचे सर्व नियमाचे कठोरात कठोर पालन करावे असेही यावेळी रेखाबाई अंधापुरे आणि राणी ताई माळवे सह कुमारी भारती ताई अंधापुरे यांनी बोलताना सांगितले आणि कुमारी भारतीताई या पुढे बोलताना म्हणाल्या की सर्व तरुण बंधू आणि भगिनींनी ही उत्कृष्ट भारतीय लस घ्यावी आणि कोरोना महामारी च्या संकटाला बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाला  आणि जिल्हा प्रशासनाला सर्वांनीच सहकार्य करावे असेही यावेळी आपले उत्कृष्ट अनमोल विचार कुमारी भारतीताई यांनी व्यक्त केले आणि सर्वांनी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करावा आणि आपले नाव या भारतामध्ये लौकिक करावे असे यावेळी भारती ताई म्हणाल्या आणि बीड जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे साहेब आणि त्यांचे सर्व डॉक्टर्स स्टाफ नर्स वार्ड बॉय या सर्वांचे आरोग्य प्रशासनाच्या कामाचे रेखाबाई अंधापुरे आणि राणी ताई माळवे सह कुमारी भारती ताई यांनी खूप खूप कौतुक केले आणि सर्वांनीच ही उत्कृष्ट उत्तम लस घ्यावी असे आवाहन यांच्याकडून यावेळी करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा