Subscribe Us

header ads

मोमीनपुर्‍याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-आ.संदिप क्षीरसागर

मोमीनपुर्‍याच्या आरोग्य केंद्रात आपीडी, आयपीडीसह प्रसुतीची सुविधा
आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या हस्ते उद्घाटन; रूग्णांना सर्व सुविधा मिळणार



बीड (प्रतिनिधी):- शहरातील मोमीनपुरा भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी, आयपीडी व प्रसुती गृहाची सुविधा आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रूग्णालय, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. सुसज्ज अशा या सुविधेचं आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मोमीनपुर्‍यातील विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगत आरोग्य सेवेसाठी कोणत्याही गोष्टीची गरज पडल्यास आरोग्य प्रशासनाला ती तातडीने उपलब्ध करून देवू, निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली.
बीड शहरातील मोमीनपुरा भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी, आयपीडी व प्रसुती गृहाची सुविधा सुरू करण्यात आली. या सुसज्ज अशा सुविधेचं उद्घाटन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट, खुर्शीद आलम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. या सुविधेमुळे या भागातील नागरीकांना, गरजूवंतांना तातडीच्या आरोग्याच्या सुविधा वेळेत उपलब्ध होणार आहेत. या भागातील जनतेने माझ्यावर प्रेम केले आहे. कोणी कितीही अडथळे आणले, अडचणी आणल्या त्यांना न घाबरता आपल्या सेवेसाठी अहोरात्र उभा आहे. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. या भागातील रस्ते, नाल्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत. लवकरच कामे सुरू होतील. आरोग्याच्या बाबतीत ज्या गोष्टीची गरज असेल त्यासाठी अपेक्षित असा निधी दिला जाईल अशी ग्वाही यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली. माझ्या कार्यकाळात या प्राथमिक आरोग्य केेंद्राच्या इमारतीचा पाया रोवला, याठिकाणी आता सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहे. त्या सुविधा सुरू करत असतांना अनेकांनी अडचणी आणल्या. परंतू त्या अडचणींना न डगमगता आपण त्या सुविधा सुरू केल्या आहेत याचा लाभ घ्यावा असे आवाहनही माजी आ.सय्यद सलीम यांनी केले. विकास कामात ज्यांना आडवं यायचं त्यांना येवू द्या, आपण लोकांची सेवा आणि विकास कामे करत राहू, जनता विकास कामात आडवे येणार्‍यांना बाजुला सारेल असे प्रतिपादन माजी आ.सुनिल धांडे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक बीड नगर परिषदेचे माजी सभापती खुर्शीद आलम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरीक, कार्यकर्ते यांनी अधिक परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा