Subscribe Us

header ads

सहाय्क पो. नि.सुरेखा धस यांची बदली;ए पी आय नितीन पाटील यांची नियूक्ती

किल्लेधारूर/प्रतिनीधी/ धारूर पोलीस स्टेशनच्या प्रमूख सहायक पो. नि. सुरेखा धस यांची धारूर पोलीस स्टेशन हुन बीड येथे बदली झाली.असून येथील पोलीस निरीक्षकाचे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. बीड शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन दगडू पाटील यांची नियूक्ती करण्यात आली आहे.धारूर येथे गेल्या पंधरा महीण्या पासून कार्यरत पोलीस स्टेशन च्या प्रमूख पदभार असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांची बीड येथे अनै. मा. वा.प्र.कक्ष बीड येथे बदली करण्यात आली असून कोरोना काळात त्यांनी उत्कृष्ट रित्या येथील व्यवस्थापन सांभाळले.त्यांचे चांगल्या कार्यामुळे त्या जनसामन्यात लोकप्रीय अधिकारी झाल्या होत्या. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी उत्कृष्ट रीत्या सांभाळली .धारूर येथे पोलीस निरीक्षक पद असताना येथील हे पद रिक्त ठेवण्यात आले.असून येथील पोलीस स्टेशनला शिवाजीनगर पोलीस स्टेशन च सहायक पोलीस निरीक्षक नितीन दगडू पाटील यांची नियूक्ती करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा