Subscribe Us

header ads

15 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत कार्यालय देवगाव यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस तीन एलईडी टीव्ही भेट

 प्रतिनिधी सुशेन बडे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶


वडवणी प्रतिनिधी-: वडवणी तालुक्यातील आदर्श देवगाव येथील 15 व्या वित्त आयोगातून व ग्रामपंचायत च्या वतीने देवगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याठिकाणी आज तीन एम आय, एलईडी टीव्ही 32.inch गावच्या सरपंच सौ मीनाताई सुरवसे, उपसरपंच श्री पंढरीनाथ दादा सुरवसे ,तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री आयुब पठाण यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव च्या मुख्याध्यापिका गाढवे मॅडम, हाडुळे सर, यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले, मागील काही दिवसांपूर्वी माझे गाव ,माझी शाळा ,गावातील ग्रामस्थ जमा झालेल्या निधीचा संपूर्णत वापर शाळेच्या विकासासाठी होईल, शाळेचे प्रगतीमध्ये गावाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, आपण सर्वांचे शाळेच्या बद्दल असणारे सकारात्मक दृष्टिकोण, आम्हा सर्व शिक्षकांना काम करण्यास प्रोत्साहन देते, , देवगाव गावातील सर्व ग्रामस्थ शाळेच्या लोकसहभागाच्या माध्यमातून जी मदत केली आहे, त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका गाढवे मॅडम ,व शाळेचे सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांच्याकडून गावकऱ्यांचे आभार मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक