Subscribe Us

header ads

नगर पुणे महामार्गावर भीषण अपघात गेवराई चे बापलेकासह 4 जणांचा जागीच मृत्यू

गेवराई प्रतिनिधी_नगर- पुणे महामार्गावरील पळवे शिवारातील एका हॉटेल समोर दोन मालवाहू ट्रक व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे व ट्रकमधील दोघे अशा चौघांचा जागेवरच मृत्यू झाला.आज दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.राजाभाऊ चव्हाण (वय ५०, रा. जातेगाव, ता. गेवराई, जि. बीड) व त्यांचा मुलगा पुरुषोत्तम चव्हाण (वय १८), शुभम राजू देशभ्रतार (वय २४, रा. चमेली, ता. काटोल, जि. नागपूर), राहुल मधुकर डोंगरे (वय ३१, रा. सावली. ता. कारंजा, जि. वर्धा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.पुण्याहून नगरकडे जाणारा मालट्रक (एमएच ४० वाय ३६८१) पुढे उभ्या असलेल्या मालट्रकवर आदळला. या दोन ट्रकच्या मध्ये दुचाकी (एमएच २१ बीएल ४६५५) सापडल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. शिवाय, ट्रकचे ब्रेक जोरात दाबल्याने ट्रकमधील लोखंडी अँगल चालकाच्या केबिनमध्ये घुसून त्यात चालक व क्लीनरचा मृत्यू झाला. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती. सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा