Subscribe Us

header ads

करूणा शर्मांच्या जामिनावर मंगळवारी होणार सुनावणी

अंबाजोगाई_राज्यांचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री  धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आल्या आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याने सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांच्या जामिना वरील  सुनावणी मंगळवारी होणार आहे.
न्या. एस.एस. सापटनेकर यांच्यासमोर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला असून  यावर मंगळवार २१ सप्टेबर रोजी होणार आहे.शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती.करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून करुणा शर्मांसह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना ५ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर ६ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती न्या. एस.एस. सापटनेकर यांच्यासमोर शर्मा यांच्या जामिनावर सुनावणी झाली.न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर २१ सप्टेंबर मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा