Subscribe Us

header ads

माजलगाव धरणातून १ लाख क्युसेकने सोडले पाणी सिंदफणा नदीवरील जुना पूल पाण्याखाली नागरिकांना सतर्कतेचा इशारा

माजलगाव : तालुक्यात व माजलगाव धरण क्षेत्राच्यावरील भागात रात्रीपासून संततधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यामुळे धरणातून १ लाख क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सिंधफना नदीत करण्यात येत आहे.मागील तीन दिवसांपासून माजलगाव धरण क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे या धरणात आवक वाढली आहे. यामुळे सोमवारी पहाटेपासून मोठ्या प्रमाणावर सिंधफणा नदी पात्रात धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. विसर्ग आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. यातच मागील चोवीस तासापासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक एक लाख क्युसेकपर्यंत वाढली. यामुळे प्रशासनाने मंगळवारी दुपारी चार वाजता धरणातून एक लाख क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती धरणाचे अभियंता बी.आर. शेख यांनी दिली. दरम्यान, माजलगाव शहरातील जुन्या गावात असलेल्या साठेनगर भागात पाण्याचा धोका असल्याने या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर सांडस चिंचोली या गावाचा पुराचा वेढा पडल्याने येथील नागरिकांना घराबाहेर पडू नये यासाठी याठिकाणी दौंडी देण्यात आली असल्याची माहिती येथील तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा