Subscribe Us

header ads

करुणा शर्मा यांनी मदत मागितल्यास ती देणार – राजेंद्र म्हस्के

बीड। करुणा शर्मा आणि महाविकास आघाडीतील मंत्री असलेले धनंजय मुंडे  हे प्रकरण गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. आता या प्रकरणावर बीड मधून भाजपची पहिली प्रतिक्रिया आली आहे. करुणा शर्मांच्या समर्थनात आता भाजप मैदानात उतरणार आहे. करुणा शर्मा यांच्यासोबत अन्याय झाला असून त्यांच्या वरील गुन्हे दाखल करणे हे चुकीचे झाले आहे. शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल टाकण्यात आली असून, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता भाजप कडून होऊ लागलीय. दरम्यान याप्रकरणी भाजप शर्मा यांच्या पाठीशी आहे, असं जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक