Subscribe Us

header ads

पाचेगाव आश्रम शाळेला विजय वड्डेटीवार मंत्री बहुजन कल्याण विभाग यांची भेट; टॅब वाटपाचा केला शुभारंभ


बीड (प्रतिनिधी) राज्याचे मंत्री. मा.विजय वड्डेटीवार हे दिनांक 26 सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आश्रमशाळा विध्यार्थ्यांना online शिक्षण मिळावे म्हणून संपूर्ण राज्यात 65 हजार टॅब आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी मंजूर केले. बीड जिल्ह्यासाठी 3500 मंजूर केले. आश्रमशाळेतील विध्यार्थी online शिक्षणात मागे पडू यासाठी स्वतः तिरुपती आश्रमशाळा ,पाचेगाव ता.गेवराई येथे भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आणि त्यांच्या हस्ते टॅब वाटप चा शुभारंभ केला. यावेळी आजूबाजूच्या 12 तांड्यावरील लोकांनी मा.मंत्री महोदयांचे जंगी स्वागत केले. विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की, विध्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी. महाज्योती कार्यालयाच्या मार्फत NEET / MHCET चे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे, त्याचा सर्वानी लाभ घ्यावा.बीड जिल्ह्यातील आश्रमशाळा मध्ये कमालीचा सकारात्मक बदल पाहावयास मिळाला. सर्व शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे, I - card सर्वांना compulsiry केले आहे. सर्व शाळा रंगरांगोटीपूर्ण आहे. संपूर्ण शाळा digital केल्या आहेत. सर्व आश्रमशाळा मध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले आहे. यासाठी मा.वड्डेटीवार साहेबांनी डॉ. सचिन मडावी सहाय्यक आयुक्त व त्यांच्या संपूर्ण टीम चे कौतुक केले. तसेच पाचेगाव आश्रमशाळा मध्ये 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी राजस्थानच्या कोटा पद्धतीनुसार इ-लर्निंग चे उदघाटन मा.वड्डेटीवार साहेबांच्या हस्ते झाले. यावेळी पाचेगाव आश्रमशाळा चे अध्यक्ष श्री. शामराव गुरुजी राठोड व सचिव गोरक्षनाथ आण्णा राठोड यांनी वड्डेटीवार साहेबांचे शाळेच्या वतीने स्वागत केले. यावेळी श्री.बबनराव तायवाडे, अध्यक्ष महाज्योती, श्री.लक्ष्मण बारगजे समाज कल्याण निरीक्षक, श्री. चव्हाण निरीक्षक, प्राचार्य राजेंद्र दाभाडे, राजेश खरसाडे मूख्याध्यापक यांच्या सह सर्व शिक्षक वृंद समस्त पाचेगाव तांड्यावरील गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दादासाहेब मुंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. बाळकृष्ण थापडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा