Subscribe Us

header ads

देवडी येथे भव्य व मोफत आरोग्य शिबिर सम्पन्न


वडवणी प्रतिनिधी_ देवडी पंचक्रोशीतील अष्टपैलू ग्रुप यांच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी तुळजाई क्लिनिक देवडी या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सविस्तर वृत्त असे की सध्याच्या घडीला ताप सर्दी खोकला अशा अनेक संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील लोक दुखणे अंगावर काढतात व आजार वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत गरजूंना मोफत सल्ला व औषधोपचार मिळावा या सामाजिक जाणिवेतून अष्टपैलू ग्रुपच्या वतीने ताप सर्दी खोकला अंगदुखी डोकेदुखी हाडांचे आजार रक्तदाब मधुमेह व इतर अत्यावश्यक उपचार गरजूंना मिळावीत या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले गेले.या शिबिरास तज्ञ म्हणून डॉक्टर नितीन उगले( शिवकमल हॉस्पिटल बीड) तसेच डॉक्टर गणेश सुरवसे (स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई )आणि डॉक्टर अमोल मुंडे (आनंद हॉस्पिटल वडवणी )यांची उपस्थिती होती. तसेच पंचक्रोशीतील डॉक्टर भागवत झाटे, डॉक्टर भागवत अरड़े,डॉक्टर रघुनाथ सूर्यवंशी, डॉक्टर श्री कृष्णा घाटोळ यांचीही उपस्थिती व मार्गदर्शन मिळाले.शिबीराचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते झाले व शिबिरास सुरुवात झाली .या शिबिरात जवळपास पाचशे रुग्णांनी मोफत सल्ला व औषधोपचार घेऊन आपला सहभाग नोंदवला. आयोजनासाठी अष्टपैलू ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम करून समाजसेवेचा वसा चालवण्याचा आदर्श परिपाठ यानिमित्ताने समाजापुढे ठेवला.
 भविष्यातही अशा विविध सामाजिक व रचनात्मक कार्याचे आयोजन अष्टपैलू ग्रुप करेल व आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावेल असा मानस ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आला.


आजच्या आरोग्य शिबिराचा शेवटचा अपडेट:

एकूण किंमत ४,५०,००० रुपये आहे त्यात ७४३ रुग्ण तपासण्यात आले व २४५ रुग्णांची शुगर तर ४५५ रुग्णांची bp आणि १७८ लोकांची ecg टेस्ट झाली व सर्वाना औषध देण्यात आली

तसेच ९ रुग्ण उपचाराभवी परत गेले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा