Subscribe Us

header ads

फुले-आंबेडकर विद्वत्त सभा ही वंचित बहुजन आघाडीची थिंकटँक--- मा. रेखाताई ठाकूर



कोल्हापूर : 26/9/202  आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी फुले-आंबेडकर  विद्वत्त सभा  ही शिक्षक, प्राध्यापक, वकील, इंजिनिअर आणि डॉक्टर या समाजातील बुद्धिजीवी वर्गाची बिगर राजकीय संघटना असून, ती वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची थिंकटँक म्हणुन काम करेल. असे मत वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याच्या प्रभारी अध्यक्षा आद. रेखाताई ठाकूर यांनी व्यक्त केले. त्या कोल्हापूर येथील हॉटेल पंचशील  मध्ये आयोजित कोल्हापूर जिल्हा विद्वत्त सभेच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होत्या. रेखाताई बोलताना पुढे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागामुळेच  वंचित बहुजन समाजामध्ये आज अशा प्रकाराचा बुद्धिजीवी वर्ग निर्माण झाला असून, आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच या  वर्गाची बाजू घेतली आहे. अन्यत: या वर्गाला नोकरीमध्येच काय कोणी जवळसुद्धा थांबवून घेतले नसते अशी परिस्थितीआहे. म्हणुन याची जाणीव आज शिक्षक, प्राध्यापक यांनी ठेवली पाहिजे. आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका निर्भीडपणे आपल्या लेखणी आणि वाणीच्या  माध्यामातून वंचित बहुजन समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे.  आद. बाळासाहेब आंबेडकर   यांनी नेहमीच सत्तेच्या राजकारणापेक्षा   विचारांच्या राजकारणाला प्राधान्य दिले असून, वंचित बहुजनांना सत्तेत पाठविण्यासाठी आपला रक्ताचे पाणी केले आहे. यावेळी राज्य उपाध्यक्ष आद. गोविंद दळवी म्हणाले की, शिक्षक - प्राध्यापक यांचेवर होणार्‍या अन्याय अत्याचारच्या विरोधात फुले-आंबेडकर  विद्वत्त सभेने आपला आवाज उठवला पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये घडणाऱ्या चुकीच्या घटना, विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक आणि गोर-गरीब वंचित बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणार्‍या धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी कृतीकार्यक्रम तयार केला पाहिजे. स्थानिक विषयावर बुद्धिजीवी वर्गाने स्थानिक पातळीवर आंदोलन उभे  करावे. वंचित बहुजन आघाडी निश्चितपणे आपल्या पाठीशी उभी राहील, शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांचा छडा लावण्यासाठी  लढा देत राहील.
सदर बैठकीस वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आद. डॉ. क्रांतीताई सावंत उपस्थित होत्या. यावेळी फुले-आंबेडकर विद्वत्त सभेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक प्रा. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी प्रास्ताविकात संघटना बांधणीच्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोल्हापूर जिल्हा विद्वत्त सभेच्या वतीने आद. रेखाताई ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फुले-  आंबेडकर विद्वत सभा कोल्हापूरचे  मा. ए. बी. इंगवले सर, मा. संजय कोठावळे सर, प्राचार्य एस. एम. कांबळे सर, डॉ. दिनकर कबीर, प्रा. विठ्ठल पांचाळ आदी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सक्रीय सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा