Subscribe Us

header ads

रेशनचा काळा बाजार करणारी टोळी गावकऱ्यांनी पकडून दिला चोप

बीड _कोरोना काळात अगोदरच लॉकडाऊन मुळे हातचा रोजगार गेल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या सामान्य नागरिकांना रेशनचे धान्य मिळत  नाही. तर दुसरीकडे रेशन धान्य दुकानदार काळ्या बाजारात धान्य विक्रीला घेऊन जात असताना गावकऱ्यांनी मध्य रात्री 1 वाजता पकडले.यामुळे बीड जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बीड तालुक्यातील तांदळवाडी गावात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांना वेळेवर धान्य मिळत नसताना रेशन माफिया काळ्या बाजारात धान्य विकत असल्याच्या प्रकारा मुळे संताप व्यक्त केला जात आहे.गावकर्‍यानी रेशन माफियांना पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या हवाली केले या प्रकरणात गावकरी आक्रमक झाले असून कारवाई ची मागणी करत आहेत.बीड तालुक्यातील 1200 लोकवस्तीच्या तांदळवाडी गावात लॉकडाऊन मुळे गेल्या सहा महिन्यापासून रेशनचे धान्य मिळत नसल्याचे गावकरी सांगत आहेत. याच गावातील रेशन धान्य दुकानदार  रात्री 1 च्या दरम्यान गावातील रेशनचे धान्य परस्पर विक्री करून टेम्पो ने घेऊन जात असताना.सुरुवातीला चोर आहेत म्हणून गावकऱ्यांनी गाडी अडवली गाडीसह रेशन माफियांना पकडले. त्यांना चोप दिला नंतर पोलिसांना फोन करून पोलिसांच्या हवाली केले मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणात रेशन माफिया वर गुन्हा दाखल झाला नसल्याने गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.रेशन दुकानदाराला पाठीशी घालणारे अधिकाऱ्यासह दुकानदारावर कारवाई केली जावी अशी मागणी गावकरी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा