Subscribe Us

header ads

धारूर घाटात सिमेंट घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला चालक जागीच ठार

धारूर_ धारूर घाटात सोलापूरहून परभणी कडे सिमेंट घेऊन जाणारा ट्रक धारूर घाटातून जात असताना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दरीत कोसळला या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला.शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर हुन परभणी कडे सिमेंट घेऊन जाणारा ट्रक क्र. एमएच 12 एनएक्स 4090 धारूर घाटातून जात असताना चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्यामुळे घाटातील अवघड वळणावर कठडा तोडून दिडशे ते दोनशे मिटर खोल दरीत कोसळला. यात चालक पैंगबर पटेल (वय 40) वर्ष गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच धारूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन पाटील तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहचले. चालकास धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी चालकाला तपासून मृत घोषित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा