Subscribe Us

header ads

पुराच्या पाण्यात पिंपरखेड येथील तिघे वाहून गेले एकाला वाचवण्यात यश


प्रतिनिधी नवनाथ गोरे मो 9823310880

वडवणी-:वडवणी दोन दिवस झाले जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.या पावसाने सर्व नद्या नाले तलाव वोअरफूल झाले आहेत.वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील नदीला देखील मोठा पुर आला आहे.या पुरत मधुकर रोहिदास खळगे वय ५० वर्ष. हे नदीमध्ये वाहुन जातांना मुलगा अजय खळगे वय २२ वर्ष याने पाहताच नदीच्या पुरत उडी घेतली आणि कसे बसे वडिलांना वाचवले परंतु वडिलांना वाचवताना मुलगा अजय हा मात्र वाहून जाऊ लागला. त्याच वेळी त्या ठिकाणी मधुकर खळगे यांचा भाच्चा भैय्यासाहेब उजगरे देखील घटनास्थळी  आला डोळ्यासमोर  मामाचा मुलगा वाहुन जाताना पाहताच त्याने लगेच पाण्यात उडी घेतली परंतु पाण्याचा वेग प्रचंड असल्याने दोघेही पुरात वाहून गेले .ही घटना दुपारी २ वाजण्याचा सुमारास घडली. गावकऱ्यांना जेव्हा ही घटना समजली सर्व गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली परंतु तोपर्यंत खुप उशीर झाला होता अजय आणि भैय्यासाहेब दोघे पुरात वाहुन गेले होते.घटनास्थळी तहसीलदार. पोलीस प्रशासन दाखल झाले असून दोघांचा शोध घेतला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा