Subscribe Us

header ads

चोरीचा आरोप करत पारधी वस्तीवर हल्ला;दोन वर्षाचा मुलगा ठार ,दहा जण जखमी

पाटोदा_ चोरीच्या आरोपातून पारधी वस्तीवर 40 ते 50 जणांच्या सशस्त्र जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन वर्षाचा मुलगा ठार झाला असून आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. तर चार वर्षाच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली.पारनेर येथे पारधी समाजाची वस्ती आहे. येथील लोकांवर गावातील काही लोकांनी चोरीचा आरोप करत मध्यरात्रीच्या दरम्यान त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये मानु अरूण काळे हा दोन वर्षाचा मुलगा ठार झाला आहे. तर शबाना अरूण काळे, विधी भोसले, अभिमान काळे, (वय 60) वर्ष, देवराबाई काळे (वय 60) वर्ष, वनिता साईनाथ भोसले (वय 17) वर्ष, करीना चव्हाण (वय 14) वर्ष, तारामती काळे, सोजरबाई भोसले यांच्यासह अन्य आठ ते दहा जण जखमी झाले.या जखमींना उपचारार्थ बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटने प्रकरणी पारनेर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावात बंदोबस्त वाढवण्यात आला. बीड येथे डिवायएसपी यांनी भेट देवून जखमींची विचारपूस केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा