Subscribe Us

header ads

बार्टी कडून प्रशिक्षण प्राप्त यूपीएससीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे श्री. धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी ,पुणे यांनी केले अभिनंदन. बार्टीचे 9 विद्यार्थी यावर्षी यूपीएससीत यशस्वी

 पुणे (दि. 24) ---- : लॉकडाऊन मधला ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या  संस्थेच्या वतीने  प्रशिक्षण प्राप्त केलेल्या, अनुसूचित जातीतील 9 विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे  बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये , यांनी अभिनंदन केले आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे ही सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था असून बार्टी संस्थेच्या वतीने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारी चे प्रशिक्षण देण्यात येते . दिल्ली येथील नामांकित संस्था ,यशदा भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र येथे विद्यार्थ्यांना पूर्व तथा मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते तसेच नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या तयारीकरीता व व्यक्तिमत्व परीक्षेच्या तयारीकरीता आर्थिक सहाय्य देण्यात येते. कोरोना महामारिच्या  काळात सुद्धा श्री धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्टीने व्यक्तिमत्व परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले . ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देणारी बार्टी ही एकमेव संस्था आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020 मध्ये यशस्वी विद्यार्थी यामध्ये सुहास गाडे (रँक-349), आदित्य जीवने (रँक-399), शरण कांबळे (रँक-542), अजिंक्य विद्यागर (रँक-617), हेतल पगारे (रँक-630), देवव्रत मेश्राम (रँक-713), स्वप्नील निसर्गन (रँक-714), शुभम भैसारे (रँक-727) आणि पियुष मडके (रँक-732) या भावी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बार्टी मार्फत दरवर्षी राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे प्रायोजकत्व देण्यात येते. परंतु मागील काही महिन्यात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत  बार्टीच्या वतीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले.    यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी, पुणे यांनी अभिनंदन केले.  असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  अभिप्रेत कार्य   उत्तीर्ण अधिकाऱ्याने करावे. तसेच सर्वसामान्यांच्या जीवनात  अमुलाग्र बदल घडवण्यासाठी आपण कार्य करावे  आपण यशस्वी झालात बार्टी संस्थेला आपला अभिमान वाटत आहे. अशा शुभेच्छा मा.श्री धम्मज्योती गजभिये यांनी यावेळी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा