Subscribe Us

header ads

बैलगाडी शर्यतीच्या प्रायोजक, आयोजकांवर, कायदा धाब्यावर बसवणा-या राजकीय पदाधिका-यांवर गुन्हे दाखल करा, मुख्यमंत्र्यांना तक्रार--- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷

बीड प्रतिनिधी_महाराष्ट्र राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी असताना, कोरोना कालावधीत जिल्हा व पोलीस प्रशासन कर्तव्यदक्षतेने कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेत असतानाच राजकीय पक्षाचे पदाधिकारी मनमानी करत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणारांना कोरोना कालावधीत अशा शर्यती घेऊ नये या संबद्धी प्रबोधन, जागरूकता निर्माण करण्यापेक्षा शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहुन प्रोत्साहन देताना बक्षिस देताना दिसत असून संबधित प्रकरणात प्रायोजक व आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी ईमेल द्वारे डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केली आहे. 


राजकीय पदाधिकारी जाणीवपूर्वक  कायदा वेशीवर टांगताना दिसताहेत 


राजकीय नेते पोलीस प्रशासनातील कौतुकास्पद कमगिरीवर पाणी फेरताना दिसुन येत असून सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी कायद्याला खेळणं समजु लागले असून कायदा केवळ सामान्य माणसालाच आहे का? अशी विचारणा करताना दिसून येत असून कायद्याचा धाक कमी करतानाच कायदा व सुव्यवस्था वेशीवर टांगताना दिसताहेत,यावर वेळीच आवर घालायला हवा. 

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो. नं.८१८०९२७५७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा